व्हीएस न्यूज - पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटेनर जात असताना फुगेवाडी जवळ बीआरटी मार्गातील दुभाजकावर चढला. यामुळे बीआरटीचे बॅरिकेटस तुटून पडले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बुधवारीही याच ठिकाणी अपघात झाल्याचे समजते. त्यामुळे बीआरटी मार्ग किती सुरक्षित आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तर बीआरटी सुरू मार्ग सुरू होण्यापुर्वी चालकांना दिसेल असा सुचना फलक लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. ...Read More
व्हीएस न्यूज - भोसरीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने उधळला आहे. याप्रकरणी सातारा येथील कुख्यात गुंडाला अटक केली आहे. व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी त्यांच्याकडून 35 लाख रूपये उसने घेणाऱ्यानेच दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. चार दिवसापुर्वीच पुण्यातील देवेन शहा या बांधकाम व्यावसायिकाचा खून झाला होता.
अमोल संपत मदने (वय 32 रा. वनवडी, कऱ्हाड) असे या कुख्यात गुंडांचे नाव आहे. उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज व त्याच्या एका नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रामभाऊ लांडगे (वय 33 रा. भोसरी) या बांधकाम व्यावसायिकाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित लांडगे यांचा उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज याच्याशी ओळख झाली. लांडगे हे शहरातील मोठे बांधकाम व्यावसायिक असल्याचे चव्हाण याला माहित झाल्याने त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. चव्हाण याचा सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील आसवले गाव येथे मोठा आश्रम आहे. नाथजी महाराज म्हणून त्याची पंचक्रोशीत ख्याती देखील आहे. या ओळखीचा फायदा घेत चव्हाण याने आश्रमाची अडचण सांगत अमित यांच्याकडे प्रथम 18 लाख तर दुसऱ्यांदा 17 असे 35 लाख रूपये मागून घेतले. ही रक्कम लांडगे यांनी चव्हाणला वारंवार मागितली. परंतू, चव्हाणला पैसे देणे शक्य झाले नाही. त्यामुळे चिडलेल्या चव्हाणने जानेवारी 2018 मध्ये लांडगे यांना जीवे मारण्यासाठी कुख्यात गुंड अमोल मदने याला 20 लाखांची सुपारी दिली. या प्रकरणाची माहिती सांगवी पोलिसांकडून लांडगे यांना मिळाली. याबाबत खात्री झाल्यानंतर लांडगे यांनी थेट पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधला. ही माहिती आयुक्तालयाने पुणे गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. अन्वेषण शाखेने तपासाची वेगाने चक्रे फिरवली अन् लांडगे यांना मारण्यासाठी मदनेला सुपारी दिल्याचे उघड झाले. मदने याच्यावर सातारा परिसरात खून, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला सातारा येथून अटक केली. चव्हाण व त्याचा नातेवाईक हे दोघे फरार आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अन्सार शेख, कर्मचारी दिनेश गडांकुश, सिराज शेख, अस्लमखान पठाण, अजय खराडे, राजू केदारी, किरण पवार, किशोर वग्गू, अजित फरांदे, प्रसाद जंगिलवाड, चंद्रकांत महाजन, गणेश नरूटे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.
भाजपाचे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कारटं धोरण
व्हीएस न्यूज - महापालिका प्रवेशव्दारावर आंदोलन केल्याप्रकरणी मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांवर दखल पात्र तर आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी भाजप नगरसेवकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचे ते कारटं या धोरणाबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तुषार कामटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुरूवारी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पालिकेच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे. प्रभागातील बेकायदा फ्लेक्स काढावेत म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामटे यांनी सोमवारी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फेकले. कामटे हे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यावर फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून होऊ लागला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेविका पौर्णिमा सोनावणे आणि मनसेचे गटनेते नगरसेवक सचिन चिखले यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेको आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा पालिका प्रशासनाने दाखल केला होता. त्यामुळे प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना अभय देत असल्याची टीका होऊ लागली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002