व्हीएस न्यूज - येथील आर्मी ग्राउंडवर परेड सुरु असताना एका जवानाला अचानक चक्कर आल्याने त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. जवानाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चक्कर आल्याची घटना शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास देहूरोड येथे घडली. चंद्रकांत चोरवाजी दाभाडगे (वय39) असे मृत जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान देहूरोड येथील 787 ब्रिगेड ग्राउंडवर ए डी ब्रिगेड परेड सुरु होती. परेड अंतिम टप्प्यात असताना चंद्रकांत दाभाडगे या जवानाला अचानक चक्कर आली. मैदानात उभी असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये जवानाला उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात हालविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दाभाडगे यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत. ...Read More
व्हीएस न्यूज - पिंपरीतील थिसेनक्रुप इंडस्ट्रीजने प्रदूषण निर्मूलन आणि आरोग्यरक्षणाचा संदेश देण्यासाठी नुकतीच सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीत कंपनीचे कार्यकारी संचालक मलई दास, वित्तविभाग संचालक गिरीश केतकर, मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र नागेशकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र वाईंगडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार सहभागी झाले होते. 12 किलोमीटर अंतराच्या या सायकल फेरीमध्ये 480 जणांनी भाग घेतला. त्यात महिला कर्माचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. ज्या कर्मचाऱ्यांकडे सायकल नाही अशा कर्मचाऱ्यांनी हे अंतर चालून पार केले....Read More
व्हीएस न्यूज - सध्या वस्तू व सेवा कर 5 ते 28 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. भविष्यात हे कर 12 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान निर्धारीत होतील. असे झाले तर देशांतर्गत मालाला मोठी जागतिक बाजारपेठ मिळू शकेल. परिणामी भारताची स्पर्धक क्षमता वाढून भारत जगातील विकसित देशांशी स्पर्धा करू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थ विश्लेषक डॉ. अभय टिळक यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने वस्तू व सेवा कर या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थविश्लेषक डॉ. टिळक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे, संयोजक डॉ. एस. एस. मेंगाळ, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. के.व्ही. अडसूळ, डॉ. एस.के. सानप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभय टिळक म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवा करप्रणाली (जीएसटी) अत्यंत महत्त्वाची आहे. विकसित देशांनी फार पूर्वीच वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी केली आहे. 13 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ही करप्रणाली विकसित झाली आहे. यामुळे भारतातील कोणत्याही राज्यात उत्पादित होणाऱ्या वस्तूची संपूर्ण भारतात एकच किंमत असेल. औद्योगिक विकेंद्रीकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे. मागील 30 वर्षापासून चीनमध्ये मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे कामगार वर्ग कमी किमतीत उपलब्ध होत होता. त्यामुळे चीनी वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होता. परिणामी जागतिक बाजारपेठेत चिनी वस्तूंच्या किमती कमी होत्या. चीनची अर्थव्यवस्था उत्पादनाभिमुख होती. मात्र, आता चिनी कामगार महाग होत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत चीनचे महत्त्व कमी होत चालले आहे. भारतीय अर्थव्यवस्था मात्र सेवाभिमुख आहे. डॉ. टिळक पुढे म्हणाले, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य या संदर्भातील जबाबदाऱ्या संबंधित राज्याने पार पाडायच्या असतात. मात्र, राज्यांकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसते. त्यामुळे राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागते. अशा पेचामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे मोठे आव्हान राज्यांपुढे असते. मात्र, वस्तू व सेवा करप्रणालीमुळे राज्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे साहजिकच राज्यांचा विकस साधला जाणार आहे. कृष्णराव भेगडे म्हणाले, देशातील एक टक्का लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. ही आर्थिक विषमता दूर होण्यासाठी संपत्तीचे समान वाटप करण्याची गरज निर्माण झाली आहे. वरचेवर भारतातील बेरोजगारी वाढतच चालली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. हे बदलण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे, असेही भेगडे यांनी सांगितले. चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी.डी. बाळसराफ यांनी केले. आयोजनामागील भूमिका संयोजक डॉ. एस. एस. मेंगाळ यांनी स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा. के.व्ही. अडसूळ यांनी, तर डॉ. एस.के. सानप यांनी आभार मानले. ...Read More
व्हीएस न्यूज - कस्पटे वस्ती, वाकड येथे सोमवारी सकाळी 10 वाजता देवर्षी नारद मंदिराचा भूमीपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सर्व्हे नं. 227/2/2, दुर्वांकूर पार्क, बालाजी निवासाशेजारी, हॉटेल ऍम्बियन्स मागे, कस्पटे वस्ती येथे चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक नीलकंठ चिंचवडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास देवर्षी नारद विद्या मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. हे मंदिर देवर्षी नारद विद्या मंडळ बांधणार आहे....Read More
व्हीएस न्यूज - : चिंचवड येथील सुप्रसिद्ध किर्तनकार दीपकबुवा रास्ते यांना पुणे येथील श्रीहरि किर्तनोत्तेजक सभेने 'किर्तन स्वरभास्कर' या पदवीने गौरविण्यात आले. नुकत्याच झालेल्या महर्षि वेदव्यास नारदीय किर्तन संमेलनात त्यांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप आहे. हे संमेलन प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात घेतले जाते. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये अनेक पुरुष, महिला आणि युवायुवती किर्तनकार सहभागी होत असतात. त्यांच्या सादरीकरणानुसार त्यांना पदवी बहाल करण्यात येते....Read More
व्हीएस न्यूज - स्त्री जातीचे एक महिन्याचे अर्भक पिंपरी रेल्वे स्टेशन येथे सापडले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम गायकवाड या कामावर जाण्यासाठी सकाळी सव्वा नऊ वाजता पिंपरी रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ रेल्वे स्टेशनवर आढळले. बाळाजवळ दुधाची बाटली, स्वेटर आणि कपड्याचा जोड आढळून आला. गायकवाड यांनी मातेबाबत चौकशी केली असता आई मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी बाळाला पिंपरी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले. हिंजवडी येथे मंगळवारी अशाच प्रकारे स्त्री जातीचे अर्भक मिळून आले होते. शहरातील पाच दिवसामध्ये अशाप्रकारेे स्त्री जातीचे अर्भक सापडणे ही चिंतेची बाब आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत. ...Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002