Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
शिरगाव साईबाबा ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करा; दोषींवर कारवाई करा – उस्मान शेखपिंपळे गुरवमध्ये एटीएमवर चोरट्यांचा डल्ला; २० लाखांहून अधिक रोकड घेऊन चोरटे पसार!सात महिन्यांपासून फरार मोक्यातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट ३ पथकाची धडक कारवाईधर्मेंद्र सोनकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला; अटक होणार का? प्रफुल्ल कदम यांच्या ‘महाराष्ट्र दुष्काळ मुक्ती’ उपोषणाला पिंपरी-चिंचवडच्या मराठवाडा जनविकास संघाचा जाहीर पाठिंबा‘भ्रष्टाचाराची कीड’ नष्ट करण्यासाठी सक्षम कायद्याची गरज – डॉ. बाबा कांबळेघरकुलात फुलला हरित संकल्प! ‘एक व्यक्ती, एक झाड’चा संदेश देत देशी वृक्षांचे वृक्षारोपणजय हिंद स्कूलविरोधातील तक्रारी प्रलंबित; चौकशी समिती दीड वर्षानंतरही निष्क्रिय असल्याचा आरोप!अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी मच्छिंद्र चिंचोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

सांगवी

पिंपळे गुरवमध्ये एटीएमवर चोरट्यांचा डल्ला; २० लाखांहून अधिक रोकड घेऊन चोरटे पसार!

· 232 reads

पिंपळे गुरवमध्ये एटीएमवर चोरट्यांचा डल्ला; २० लाखांहून अधिक रोकड घेऊन चोरटे पसार!

गॅस कटरने मशीन फोडून रोकड लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारत पुरावे मिटविण्याचा प्रयत्न

व्हिएस न्युज - पिंपळे गुरव परिसरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मशीनमधील तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड लंपास केली. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून ही चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये, यासाठी चोरट्यांनी कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. मंगळवारी, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे पाच वाजण्यापूर्वी हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Om sai interior

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ असलेल्या श्वेतायान समृद्धी कॉलनीतील शॉप क्रमांक १० मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर आहे. अज्ञात चोरट्यांनी नियोजनपूर्वक या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर HYOSUNG कंपनीची एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यामधील २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी तपव्रत जिबोतोष चक्रवर्ती (वय ३४, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

एटीएम सेंटरमध्ये एवढी मोठी रक्कम असताना चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडून रोकड लंपास केली. नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या चोरीमुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या चोरट्यांचा सांगवी पोलीस कधी आणि कसा शोध लावतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Om sai interior