व्हीएस न्यूज - केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी मंगळवारी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही सत्तेवर संविधानात बदल करण्यासाठीच आलो आहोत, असे वक्तव्य हेगडे यांनी केले होते. त्यावर एमआयएमचे नेते गुरुशांत पट्टेदार यांनी हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास आम्ही १ कोटींचे बक्षीस देऊ, अशी घोषणा केली आहे. गुरुशांत पट्टेदार हे कलबुर्गी जिल्ह्याचे माजी पंचायत सदस्य आहेत.
हेगडे यांनी मंगळवारी धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्यांना स्वतःचे मूळ माहिती नाही. त्यांना संविधानानेच धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचा अधिकार बहाल केला आहे. पण, वारंवार याच संविधानात बदल करण्यात आले आहेत आणि आता आम्हीही असे बदल करू, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही सत्तेवर संविधानात बदल करण्यासाठीच आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेगडे कोप्पल जिल्ह्यातील कुकानूर शहरात ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. आता एमआयएमचे नेते गुरुशांत पट्टेदार यांनीही त्यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002