व्हीएस न्यूज - राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांचा थकीत भत्ता आणि दिवाळी बोनस एकत्रित देणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी जोरात होणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून महागाई भत्ता थकीत आहे. दिवाळीपूर्वी महागाई भत्यासह कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देणार असल्याची रावते यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचा फायदा राज्यातील १ लाख सात हजार एसटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
यंदाच्या दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना मागीलवर्षी प्रमाणे २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. यासोबतच जुलै २०१६ ते सप्टेंबर २०१७ पर्यंतचा महागाई भत्ताही देण्यात येणा आहे. ही रक्कम एकत्रितपणे दिवाळीपूर्वीच म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दिवाळी बोनस आणि थकीत महागाई मिळून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेमुळे सरकारी तिजोरीवर जवळपास १४० कोटींचा भार पडणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002