व्हीएस न्यूज - तरुणांचे आयुष्य उध्वस्त करणा-या आणि मुंबईतील विविध इमारतीला आगीचा धोका निर्माण करणा-या हुक्का पार्लरच्या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने धडक मोहीम सुरू केली आहे. या हुक्का पार्लरपासुन दूर राहण्यासाठी तरुणांना आवाहन करीत असतानाच त्यावर कारवाई करण्यासाठी या मोहीमेद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
मुंबईतील कमला मिल येथील पबमध्ये आग लागून १४ जणांचा बळी गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद थेट देशाच्या संसदेपर्यंत उमटले. ही आग लागली त्याच दिवशी आमदार नितेश राणे यांनी या आगीला अनधिकृत हुक्का पार्लर कारणीभूत असू शकतात, अशी शक्यता वर्तविली होती. पुढे या आगीच्या झालेल्या चौकशीत तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. समाजाला घातक असणा-या हुक्का संस्कृतीच्या विरोधात आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एल्गार पुकारला आहे. १० ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने संपूर्ण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहीमेत सर्व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002