व्हीएस न्यूज - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आता दरवर्षी ७७ हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा देणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाख रूपयांपेक्षा कमी आणि जे सरकारी किंवा स्वायत्त संस्थेचे कर्मचारी नाहीत, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या योजनेला ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना’ असे नाव असेल.
सिसोदिया म्हणाले, या योजनेतंर्गत ज्येष्ठांना तीर्थयात्रेचा लाभ घेता येणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. मथुरा-वृंदावन-आग्रा-फत्तेपूर सिक्री, हरिद्वार-ऋषिकेश-नीलकंठ, पुष्कर-अजमेर,अमृतसर-आनंदपूर साहिब आणि जम्मू-वैष्णो देवी मंदिराचा समावेष आहे. यातील स्थान निवडण्याचे ज्येष्ठांना स्वातंत्र्य आहे. यात प्रवास खर्च, निवासस्थान आणि जेवण्याची सोय केली जाईल. प्रत्येक यात्रेकरूसाठी ७ हजार रूपये खर्च येतील. ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचा एक परिचारक ठेऊ शकतात. त्याचा खर्चही सरकार करेल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002