व्हीएस न्यूज - महेंद्र सिंह धोनी
आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा कर्णधार असणार
आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली असल्याचा खुलासा सुरेश रैनाने केला आहे.
गेल्या २ वर्षापासून रैना गुजरात लायंस टीमचा भाग होता. गुजरात लायंसचा तो कर्णधार
होता. धोनी आणि जडेजाला ११ व्या सीजनसाठी फ्रेंचायजीने रिटेन केले आहे. पहिल्या
सीजनपासून आठव्या सीजनपर्यंत धोनी टीमचा कर्णधार होता. यंदा देखील त्यालाच कर्णधार
बनवले जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा रैनाला धोनीनंतरची जबाबदारी
मॅनेजमेंटने सोपवली आहे.
धोनी जर अनफिट असला तर रैना कर्णधार असेल. सीएसके २ वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. २७ आणि २८ जानेवारीला होणाऱ्या लिलावावर आता सगळ्यांची नजर असणार आहे. रैनाने म्हटले आहे की, टीमचा कर्णधार धोनी असेल तर मी उपकर्णधार. एक ऑलराउंडर म्हणून जडेजा टीममध्ये असेल. यानंतर आता आमची नजर लिलावावर आहे. लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत. त्यानंतर लिलावाची तयारी करु.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002