व्हीएस न्यूज - काही दिवसांपूर्वी रिलायंस जिओने न्यू ईअर ऑफरच्या अंतर्गत आपल्या युजर्ससाठी १ जीबी प्लॅनची किंमत कमी केली होती. ५०-६० रुपयांनी याची किंमत कमी करण्यात आली होती. कंपनीने पुन्हा एकदा युजर्ससाठी एक जबरदस्त कॅशबॅक ऑफर आणली आहे. कंपनी यात ३९८ किंवा त्याच्याहुन जास्त किंमतीच्या रिचार्जवर ४०० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. ३०० रुपयांचा कॅशबॅक सिलेक्टेड डिजिटल वॉलेटवर दिला जात आहे.
५०-५० रुपयांचे ८ वाऊचर माय जिओ अॅप रिचार्ज करताच जिओ अॅपच्या माय वाऊचर सेक्शनमध्ये ट्रांसफर होतील. तुम्ही ज्याचा वापर ३९८ किंवा त्याहुन जास्त किंमतीच्या रिचार्जसाठी करू शकता. तुम्ही एका वेळी फक्त एकच वाऊचर वापरू शकता. जसजसे तुम्ही पुढे पुढे रिचार्ज करत जाल तसतसे तुम्हाला ५० रुपयांचा कॅशबॅक मिळत जाईल. ऑनलाईन रिचार्ज केल्यास १६ ते ३१ जानेवारीपर्यंत ही ऑफर तुम्हाला मिळेल. ३०० रुपयांचा कॅशबॅक अॅमेझॉन पे, फोन पे, फ्रिचार्ज आणि पेटीएमवर मिळत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002