प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांना मिळणार पद्मश्री पुरस्कार
मुंबई
2018-01-27
प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांना मिळणार पद्मश्री पुरस्कार
व्हीएस न्यूज - केंद्र सरकारच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ८५ जणांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पद्यश्री पुरस्काराने अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. जेव्हा राष्ट्र ऐवढा मोठा सन्मान देते तेव्हा खूप आनंद मिळतो. मला या पुरस्काराच्या स्वरुपात माझ्या अभिनयाचे फळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, इलायाराजा (संगीत) आणि परमेश्वरन यांना पद्मविभूषण तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि बिलियर्डपटू पंकज अडवाणीला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी दोन मान्यवरांची निवड झाली आहे. यात साहित्यिक गंगाधर पानतावणे व शिक्षणतज्ज्ञ अरविंद गुप्ता यांचा समावेश आहे.