व्हीएस न्यूज - - रस्त्यावरील खड्डय़ांसोबत सेल्फी काढणे आणि त्या विषयावर आंदोलन छेडणे किंवा अन्य मार्गाने त्याविषयी निषेध नोंदविणे यापेक्षा मी तो खड्डा कसा बुजवता येईल यासाठी प्रयत्न करेन. कारण याच खडय़ामुळे उद्या माझा किंवा माझ्या जवळच्या कोणाचा तरी अपघात होऊ शकतो. त्याचबरोबर सर्व काही सरकारवर सोडण्यापेक्षा आपणही काही तरी केले पाहिजे, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.
नाना पाटेकर हे आपला माणूस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिकला आले होते. पाटेकर यांनी यावेळी पत्रकारांशी गप्पा मारतांना चित्रपटासह विविध विषयांवर विचार मांडले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी सर्व खड्डे बुजविण्याची घोषणा केली. राष्ट्रवादीने त्यावर खड्डे विथ सेल्फी हे आंदोलन सुरू केले. सामान्य नागरिक म्हणून मला सेल्फी काढून आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा तो खड्डा बुजवायला आवडेल. कोणी काय करावे हा ज्याच्या त्याचा प्रश्न, असे पाटेकर यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002