व्हीएस न्यूज – मराठमोळ्या अजिंक्य रहाणेसह रोहित शर्माला क्रिकेटमध्ये उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारकडून शिवजयंती दिनी शासनाचा ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या फेसबुक अकाउंटवर पुरस्कारासोबतचा एक फोटो अजिंक्य रहाणेने पोस्ट केला. तसेच आपल्याला या पुरस्कारासाठी पात्र मानल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आतापर्यंत १९५ जणांची निवड गत तीन वर्षांच्या या पुरस्कारासाठी झाली. यामध्ये औरंगाबादची गुणवंत बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे ही राज्य शासनाचा हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील पहिली सर्वात युवा खेळाडू ठरली. १७ वर्षीय साक्षीने वयाच्या १५ व्या वर्षी २०१४-१५ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावला.
रमेश तावडे, डॉ. अरुण दातार, बिभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. तसेच टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मासह अजिंक्य रहाणे, औरंगाबादच्या अंकित बावणेला हा पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय ऑलिम्पियन अॅथलीट ललिता बाबर, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, रोव्हर दत्तू भोकनळचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002