ओवेसी यांचा देशाचे तुकडे करणे हाच हेतू – गिरीराज सिंह
मथुरा
2018-02-26
व्हीएस न्यूज –एमआयएम अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांच्यावर बाबरी मशीद प्रकरणी केलेल्या विधानाविरोधात केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी तोफ डागत मोहम्मद अली जिनाच्या भुताने अशाप्रकारच्या लोकांना झपाटले असून यांचा देशाचे तुकडे करणे हाच हेतू असल्याचा आरोप केला.
ओवेसी यांनी अयोध्येत बाबरी मशीद पुन्हा एकदा उभारू व सर्वोच्च न्यायालय मुस्लिमांच्या बाजूने निकाल देईल असे विधान केल्यानंतर सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. भारतातील मुस्लिम बाबरचे वंशज किंवा विदेशी नागरिक नाहीत. भगवान रामाचे ते वंशज आहेत. आमची पूजेची पद्धत वेगळी असली तरी आमचा उगम एक आहे. पण मोहम्मद अली जिनाचे भूत ओवेसीसारख्या लोकांच्या हृदयात शिरले आहे. म्हणूनच ते देश तोडण्याच्या मागे लागले आहेत. ते मक्का-मदिन्याला जाऊ शकतात. पण आम्ही कोठे जावे ? राम मंदिर काय पाकिस्तानात बांधायचे का ?” असा सवाल सिंह यांनी केला.