गोवा शिवसेना प्रमुखांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम करणे भोवले
पणजी
2018-03-04
व्हीएस न्यूज – शिवसेनेचे गोवा प्रमुख शिवप्रसाद जोशी यांची हकालपट्टी करण्यात आली असून या कारवाईला शिवसेनेच्या राज्य प्रवक्ते जितेश कामत यांनी देखील दुजोरा दिला आहे.
शिवप्रसाद जोशी यांच्या हकालपट्टीनंतर गोवा प्रमुखपदी जितेश कामत यांचीच निवड होण्याची शक्यता असून जोशी यांची हकालपट्टी पक्षविरोधी काम केल्यामुळे करण्यात आल्याची माहिती कामत यांनी दिली आहे. पक्षाचे गोवा प्रभारी संजय राऊत यांनी हा निर्णय घेतला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जोशी यांची शिवसेनेचे गोवा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आली होती.