भारतरत्न पुरस्काराने फुले दाम्पत्याचा गौरव करावा –सुप्रिया सुळे
नवी दिल्ली
2018-03-06
व्हिएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी केली.
भारतरत्न पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना जाहिर करावा अशी मागणी संसदेत केली. देशाच्या सामाजिक अभिसरणात या दांम्पत्याने मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल.
फुले दांम्पत्याने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच सामाजिक अभिसरणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांना भारतरत्न जाहीर झाल्यास पुरस्काराचा सन्मान ठरेल असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली.