मोदींचा एकेरी उल्लेख केल्यामुळे जवानाचे ७ दिवसांचे वेतन कापले
नवी दिल्ली
2018-03-09
व्हिएस न्यूज– पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करताना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने ‘आदरणीय’ किंवा ‘श्री’असा न केल्यामुळे त्याला सीमा सुरक्षा दलाने शिक्षा सुनावली आहे. बीएसएफने हा पंतप्रधानांचा अनादर असल्याचे कारण देत त्याजवानाचे ७ दिवसांचे वेतन कापले आहे.
महतपूर, नादिया (पश्चिम बंगाल) येथे बीएसएफच्या १५ व्या बटालिअनच्या मुख्यालयात ही घटना घडली. कॉन्स्टेबल संजीव कुमार यांनी झीरो परेडमध्ये अहवाल सादर करताना “मोदी प्रोग्राम” असा उल्लेख केला. कुमार यांच्याविरोधात बटालियनचे कमांडिंग अधिकारी, कमांडंट अनुपम लाल भगत यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बीएसएफ कायद्याच्या कलम ४० अन्वये संजीव कुमार दोषी आढळल्यामुळे कुमार यांचे ७ दिवसांचे वेतन कापण्यात आले.