व्हिएस न्यूज - चॉकलेटचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलाला निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास कुदळवाडी येथे घडला.
इर्शाद शहा (रा. फाईन काट्याजवळ, कुदळवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुळशी रोड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला कुदळवाडी येथील रिव्हर रेसिडेन्सीच्या जवळ नदीजवळ नेले. त्याला धमकावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलाने घरी आल्यानंतर वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.