व्हिएस न्यूज - राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयत डुडूळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पदवीगृहण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार विलास लांडे, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, विश्वस्त मारूती वाघमोडे, प्रताप खिरीड, डॉ. अशोक पाटील, प्रा. किरण चौधऱी, प्रा. डॉ. रमेश काटेदेशमुख, अश्विनी भोसले-चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ऋतिका जगताप व प्रा. अशिष फुगे यांनी केले. प्रा. मारूती शिंदे यांनी आभार मानले.