कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला – प्रवीण तोगडिया
नागपूर
2018-03-09
व्हीएस न्यूज – विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आपल्या गाडीवर ट्रक चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे. प्रवीण तोगडिया संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी आरोप केला आहे.
कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला पण आपण त्यातून सुखरूप बचावलो. ही संघाची जागा असल्यामुळे आपण येथे बोलणार नसल्याचेही तोगडिया म्हणाले. बुधवारी तोगडिया यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात झाला होता. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. एका ट्रकने त्यांच्या बुलेटप्रुफ गाडीला मागच्या बाजूने धडक दिली. प्रविण तोगडिया यांना झेड प्लस सुरक्षा आहे. पण अपघात झाला तेव्हा तोगडिया यांच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक गाडीपासून फार मागे होते. अपघातानंतर प्रविण तोगडिया अहमदाबादला गेले.