व्हीएसन्यूज - गुजरात विधानसभेत काँग्रेस आणि भाजप आमदारामध्ये तुफान राडा पाहण्यास मिळाला आहे. यादरम्यान भाजप आमदाराला काँग्रेस आमदाराने चक्क पट्याने मारहाण केली आहे. कुठल्या तरी कारणावरून काँग्रेस आमदार प्रताप दुधात आणि भाजप आमदार जगदीश पंचाल यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की दोघेही हमरीतुमरीवर आले. प्रताप दुधात यांनी या धुमश्चक्रीत रागाच्या भरात कमरेचा बेल्ट काढून पंचाल यांना भरसभागृहात मारहाण केली. इतर आमदारांनी दोन्ही आमदारांचा वाद विकोपाला गेल्याचं पाहुन या वादात उडी घेत दोन्ही आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस आमदार विक्रम माडम यांनी सभागृहातला माईक तोडला. दोन्ही आमदारांना शांत राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही कारवाई करण्यात आली नाही.