व्हीएसन्यूज - नुकताच राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी राज्यसभेसाठी भाजप कडून अर्ज भरला आहे. पण सेनेचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्याबाबत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे. नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपने सुरू केली असताना शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी आता त्यांच्या भात्यातले बाण बाहेर काढले आहेत. त्यांनी नियमांवर बोट ठेवत नारायण राणेंच्या उमेदवारीवरच सवाल उपस्थित केले आहेत. राणेंनी अर्ज भरण्याआधी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले का ?, जर हो तर कधी स्वीकारले जर ते भाजपचे सदस्य झाले तर मग महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला का, असे प्रश्न सेनेचे मुंबईतील आमदार अनिल परब यांनी उपस्थित केले आहे. याचे कारण असे की, एकच व्यक्ती एकाच वेळेला दोन पक्षांच्या सदस्य असू शकत नाही. आता यावर भाजप किंवा खुद्द राणेंकडून स्पष्टीकरण येते का, हे पहावे लागेल.