व्हीएस न्यूज –वयाच्या ७६ व्या वर्षी बुधवारी सकाळी भौतिकशास्त्रातील संशोधनामुळे जगभरात सुप्रसिद्ध असणारे स्टिफन हॉकिंग यांचे निधन झाले. केंब्रिज येथे एका प्रसिद्धपत्रकाद्वारे ही माहिती लुसी, रॉबर्ट आणि टीम या त्यांच्या मुलांनी दिली आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत हॉकिंग्स यांनी मांडला होता. यामुळे ते सुप्रसिद्ध झाले होते. त्यांची मुले लूसी, रॉबर्ट आणि टिम यांनी सांगितल्याप्रमाणे, केम्ब्रिज येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी यावेळी भावना व्यक्त करताना म्हटले, की आपल्या शोध आणि ह्युमरने अख्ख्या जगाला प्रेरित करणारे आमचे वडील सदैव आमच्या आठवणीत राहतील.