व्हीएस न्यूज - पुणे सत्र न्यायालयाने हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काल मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेंना या अहवालावरुन जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली होती.