विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन
पिंपरी चिंचवड
2018-03-16
व्हीएस न्यूज - हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त विश्व श्रीराम सेना पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवार, दि. 18 मार्च रोजी आकुर्डी येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आकुर्डी फोर्स मोटर्स कंपनीसमोरील मनपा उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर सकाळी 9 वाजता इच्छुक बेरोजगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात 8वी, 10वी पास नापास, पदवीधर, पदव्युत्तर आपला बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. तसेच उत्पादन, फार्मसी,फायनान्स, बीपीओ, कॉलसेंटर, आयटी, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बॅकिंग, ॲग्रीकल्चर, सिक्युरीटी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत.