व्हीएस न्युज - फेसबुकवरची मैत्री नाशकातील एका विवाहितेला चांगलीच महागात पडली. महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून दिल्लीच्या तरुणाने तिच्यावर सलग चार वर्ष बलात्कार केल्याचा आरोप आहे.
दिल्लीत राहणाऱ्या अमित जाजूसोबत पीडित महिलेची फेसबुकवरुन ओळख झाली होती. दोघांमध्ये चॅटिंगला सुरुवात झाली.
अमित 14 जानेवारी 2014 रोजी तिला भेटण्यासाठी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये आला. त्यावेळी त्याने पाण्यातून महिलेला गुंगीचं औषध पाजलं आणि तिचे अश्लील व्हिडिओ मोबाईलवर रेकोर्ड केले.
हे व्हिडिओ पती आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना दाखवण्याची धमकी देत अमितने सलग चार वर्ष अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. जानेवारी 2014 ते जानेवारी 2018 या चार वर्षांच्या काळात गुजरातमधील वापी, तसंच मुंबईतील बोरिवली, दादर, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेत त्याने अत्याचार केल्याचं पीडितेने सांगितलं आहे.
इतकंच नाही, तर आपल्याकडे तीन लाख रुपयांची मागणी करत 20 हजार रुपये उकळल्याचा दावाही तिने केला आहे.
या सर्व प्रकारात अमित जाजूची आईसुद्धा सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे दोघांवरही नाशकातील सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे महिलांनी फेसबुकवर अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिस करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002