व्हीएस न्यूज –सर्वोच्च न्यायालयाने ‘आधार’च्या डेटा सुरक्षेवर चिंता व्यक्त करत ‘आधार’चा डेटा आधारची नोंदणी करताना केंद्रचालक कॉपी करु शकतो. याशिवाय आधार सक्तीचा धडाका खासगी कंपन्यांनीही लावला असून त्या देखील ‘आधार’चा गैरवापर करु शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय घटनापीठासमोर आधार सक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्या. चंद्रचूड मंगळवारी झालेल्या सुनावणीत म्हणाले,सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांमधून अजूनही ‘आधार’चा डेटा सुरक्षित राहील हे सुनिश्चित झालेले नाही. या डेटाचा गैरवापर होऊ नये एवढेच आमचे म्हणणे असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. व्यावसायिक कामासाठी नागरिकांच्या खासगी माहितीचा वापर केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ला फटकारले असून तुम्ही नागरिकांच्या माहितीचा गैरवापर होणार नाही, असे सांगता. पण आधार नोंदणीचे काम खासगी संस्थांना देण्यात आले आहे. केंद्रचालक या संस्था नोंदणी करताना‘आधार’चा डेटा त्यांच्याकडे कॉपी करुन ठेवू शकतात, असे न्यायालयाने नमूद केले.