आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
बेळगाव
2018-03-31
urn off for: Marath
व्हीएस न्यूज - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांच्यासह याप्रकरणी चौघा जणांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर, प्रकाश बेळगोजी व स्थानिक नेते आर. एस. नाईक यांचा समावेश आहे.