वैवाहिक अत्याचाराला गुन्ह्याचा दर्जा देण्यास पुरुषांच्या एनजीओचा विरोध
नवी दिल्ली
2018-04-06
व्हीएस न्यूज – गैरसरकारी संस्थेने (एनजीओ) वैवाहिक अत्याचाराला गुन्ह्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेचा पुरुषांच्या एनजीओने विरोध केला असून विवाहित महिलांना कायद्याने पतीद्वारे केल्या जाणाऱ्या लैंगिक हिंसेविरुद्ध पुरेसे संरक्षण दिलेले असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
कलम ३७५ च्या संवैधानिक वैधतेला आरआयटी फाउंडेशन व ऑल इंडिया डेमोक्रेटिक असोसिएशन या मेन वेलफेअर ट्रस्ट या एनजीओने आव्हान देत हा कायदा विवाहित महिलांवर पतीद्वारे होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत भेदभाव करणारा आहे, असे म्हटले होते. स्त्रियांच्या संरक्षणासाठी घरगुती हिंसाचार नियम, विवाहित महिलांवरील अत्याचार, अनैसर्गिक शारीरिक संबंध या कायद्यांद्वारे पुरेसे संरक्षण मिळत असल्याचे मेन वेलफेअर्स ट्रस्ट संस्थेचे म्हणणे आहे.