व्हीएस न्यूज – लिंगायत समाजातील अनेक महंतांची लिंगायत समाजाचं विभाजन होऊ देऊ नका अशी मागणी असून भाजप जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणतेही विभाजन होणार नाही, आम्ही यासाठी वचनबद्ध आहोत. केंद्र सरकार लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची शिफारस मान्य करणार नसल्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महंतांसोबत बोलताना स्पष्ट केले आहे.
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने यापूर्वीच घेत असून चेंडू केंद्र सरकारकडे टोलवला आहे. भाजपने काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला प्रखर विरोध केला आहे. लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५,२८,२९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील. कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के आहे. कर्नाटकमध्ये १२ मे रोजी २२४ जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.