Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |

कौशल्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणारे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान 

http://www.vsnews.co.in/upload/2018-04-06/858817355yojana.jpg

जालना 2018-04-06

व्हीएस न्यूज - राज्यातील युवक व युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान म्हणजे आर्थिक सक्षमता प्रदान करणारे मूलभूत केंद्र ठरले आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना आजपर्यंत विविध क्षेत्रात रोजगार प्राप्त झालेला आहे. प्रशिक्षणानंतर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने खऱ्या अर्थाने युवकांना आर्थिक संपन्नता मिळते. त्यामधूनच युवावर्ग स्वत:च्या विकासासोबतच देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावत आहे. यामुळेच देशाच्या विकासाची वाटचाल अधिक समृद्ध होत आहे. जालना जिल्ह्यातील युवक युवतींना प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. चालू वर्षात जिल्ह्यात या योजनेंतर्गत 79 प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून 2 हजार 468 प्रशिक्षणार्थींनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

कौशल्य विकास अभियानांतर्गत 18 ते 45 वयोगटातील किमान 5 वी उत्तीर्ण असलेल्या व त्यापुढील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य विकासाचे विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येते. गारमेंट, ब्युटिशियन, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल, आयटी, संगणक, डिजिटल फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, बांधकाम, सिक्युरिटी,इलेक्ट्रॅानिक्स, प्लंबर आदी विविध क्षेत्रामधील प्रशिक्षण या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमाप्र, इमाव,खुला वर्ग, अल्पसंख्यांक व प्रकल्पग्रस्त अशा सर्व प्रर्वगातील युवक व युवतींना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. यामुळे सर्वच स्तरातील उमेदवारांना प्रशिक्षणासाठी समान संधी प्राप्त झाली आहे.

प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाची ठळक व्युहरचना

1) उमेदवारांची नोंदणी करणे, रोजगार क्षेत्रातील पेठेतील मागणी नुसार नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून व्हि.टी.पी. (Vocational Training Provider) बायोमॅट्रीक पद्धतीने उमेदवाराची उपस्थिती नोंदवून त्यांना बाजारपेठेतील/उद्योगाच्या मागणीनुसार कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन रोजगार अथवा स्वंयरोजगार उपलब्ध करूण देणे.

2) कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता उपलब्ध पायाभूत सूविधांचा महत्तम वापर करून आवश्यकतेनुसार अधिक सुविधा निर्माण करणे.

3) विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्‍या कौशल्य विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एका छत्राखाली आणणे.

4) कुशल मनुष्यबळाची मागणी व पुरवठ्याचे नियमित सर्वेक्षण व संशोधन करून रोजगार बाजार माहिती प्रणालीच्या (LMIS) आधारे मनुष्यबळाचे नियोजन करणे.

5) कौशल्य विकासाठी आवश्कतेनुसार नव-नवीन अभ्यासक्रम तयार करणे व त्यांचे प्रमाणीकरण करणे.

6) उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था या सर्वांच्या सहभागातून शिक्षण व प्रशिक्षणाच्या विविध स्तरावर व्यावसायिक प्रशिक्षणाचा अंतर्भाव करुन त्यांची रोजगारा विषयी क्षमता बांधणी करण्यासाठी व कार्यपद्धती आखण्यासाठी नियोजन करणे व संबधित विभागानी त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्प्रेरकाची भूमिका बजावणे.

7) कौशल्य विकास कार्यक्रमासाठी उद्योग समूहांच्या सी. एस. आर. निधीचा सहभाग घेणे.

8) कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये उद्योग समूह व खाजगी संस्थाना सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर सहभागी करुन घेणे.

9) कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगार क्षमता वाढविण्याकरिता शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमाचा विस्तार करणे.

10) पारंपारिक किंवा प्रत्यक्ष कामातून कौशल्य धारण केलेल्या उमेदवारांच्या कौशल्याचे प्रमाणीकरणाद्वारे त्यांची रोजगार क्षमता वाढविणे.

11) उद्योजकता व स्वंयरोजगाराला चालना देण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्‍या सर्व महामंडळाच्या योजनांचे सुसूत्रीकरण करून त्यांची अंमलबजावणी एकात्मिक ई-प्रशासन संगणकीय प्रणालीद्वारे करणे.

कौशल्य विकासासंबंधी अधिक मनुष्यबळ मागणीची 11 क्षेत्रे

MES (MODULAR EMPLOYABLE SKILLS) एकूण 72 सेक्टर मधील 596 अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यापैकी जास्त मागणी असलेले 11 सेक्टर निश्चित केले असून त्यामध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.

बांधकाम क्षेत्र, उत्पादन व निर्माण क्षेत्र, वस्त्रोद्योग क्षेत्र, ऑटोमोटीव्ह क्षेत्र, अतिथ्य / आदरातिथ्य क्षेत्र, आरोग्य देखभाल क्षेत्र, बँकींग, वित्तिय सेवा व विमा क्षेत्र, संघटीत किरकोळ विक्री क्षेत्र, औषधोत्पादन व रसायन क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान व संलग्न क्षेत्र, कृषी प्रक्रिया क्षेत्र.

प्रशिक्षण संस्थांची नोंदणी : महाराष्ट्र कौशल्य विकास सेासायटीच्या www.mssds.in / www.mahaswayam.in या वेब पोर्टलवर प्रशिक्षण देणाऱ्‍या संस्थाना व्होकेशन ट्रेनिंग प्रेाव्हाईडर (VTP) म्हणून ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा आहे. संस्था नोंदणी विनामुल्य आहे. संस्था तपासणीकरिता रुपये 5000/- तपासणी फी. (ज्या संस्थाNSDC/SSC द्वारे मान्यता प्राप्त असतील तर त्यांना यातून सूट आहे) संस्था सूचिबद्ध करण्याकरिता रुपये 10,000/- इनपॅनलमेंन्ट फी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‘स्कील इंडिया’ या संकल्पनेस अनुसरुन महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवले असून राज्यातील युवक/युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करणे, अधिक मागणी असलेल्या उद्योग सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत परिवार व समाजाला एक उत्पादक सदस्य म्हणून आपले भावी आयुष्य समर्थपणे घडविता यावे यासाठी कौशल्य विकासासंबधी सर्व समावेशक अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक तरुण, तरुणींनी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन आपले भावी आयुष्य समर्थपणे घडवावे, एवढेच या निमित्ताने.

- अमोल महाजन

जिल्हा माहिती कार्यालय, जालना

223
Download Android Application

Recommended

.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!