रेल्वेला मिळाले १२ हजार हॉर्सपॉवरची क्षमता असलेले सर्वात शक्तिशाली इंजिन
पाटणा
2018-04-10
व्हिएसन्यूज - भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे इंजिनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. हे इंजिन १२००० हॉर्सपावर क्षमतेचे असून त्याचा ताशी १२० किमी वेग आहे आणि त्याची ६ हजार टन वजन खेचून नेण्याची क्षमता आहे. हे इंजिन फ्रान्सच्या एल्सटॉम या कंपनीच्या मदतीने बिहारमधील मधेपुरातील कारखाण्यात तयार करण्यात येणार आहे. भारत हा अशा क्षमतेचे इंजिन चालवणारा जगातला पाचवा देश बनला आहे. या आधी अशा प्रकारची इंजिन रशिया, चीन, जर्मनी आणि स्विडनमध्ये चालवली जात आहेत. या इंजिनाची रचना भारताच्या गरजा आणि वातावरण लक्षात घेऊन करण्यात आली असून अती थंड आणि गरम वातावरणातही हे इंजिन उत्तमपणे कार्य करू शकते. हे इंजिन तयार करताना पर्यावरणाचा विचार करण्यात आला आहे. यात एलईडी लाईट्स आणि पुनर्रवापर करणाऱ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आल्यामुळे ८७ टक्के ऊर्जा बचत होऊ शकते.