हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत इंडिगोने स्पष्टीकरण दिले आहे. डॉक्टरांना तक्रारीचे निवारण करण्याआधीच राग अनावर झाल्याचे इंडिगोने म्हटले आहे. कोणतीही लिखीत तक्रार डॉक्टरांकडून मिळाली नसल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या सोमवारी सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी लखनऊ येथून बंगळुरूला जाणा-या ६ ई-५४१ विमानात हा प्रकार झाला. याच विमानाने बंगळुरूला जाण्यासाठी हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सौरभ राय बसले. ते ज्या ठिकाणी बसले होते त्यांच्या मागच्या सीटवरील लहान मुले डासांच्या चावण्याने हैराण झाले होते. इंडिगोच्या क्रू मेंबर्सकडे अनेक प्रवाशांनी याबाबत तक्रार देखील केली होती. डॉ. राय यांनीही त्यानंतर तक्रार केली. राय यांच्याशी त्यावर अरेरावी करत क्रू मेंबर्सनी चक्क त्यांनाच विमानातून खाली उतरवले. डॉ. सौरभ यांना यानंतर दुस-या विमानाचे तिकीट काढून बंगळुरूला जावे लागलं. कोणतीही लिखीत तक्रार डॉक्टरांकडून मिळाली नसल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002