व्हीएस न्यूज –केवळ आशियातच नाही तर, जगात श्रीलंकेची आरोग्य सेवा अव्वल असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी दिली असून ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेर्डोस अधनॉम घेब्रेयेसस श्रीलंकेत आले होते.
श्रीलंकेतील आरोग्य सेवा मोफत उपलब्ध असल्यामुळे तसेच त्याला राजकीय नेतृत्वाचे योग्य मार्गदर्शन असल्यामुळे येथे चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत असल्याचे टेर्डोस म्हणाले. श्रीलंकेची याआधी कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये गणना होत होती. पण आता श्रीलंकेचा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये समावेश झाला असल्यामुळेच श्रीलंकेने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे टेर्डोस म्हणाले. तसेच, हे उच्च उत्पन्न असलेल्या राष्ट्रांसाठी उत्तम उदाहरण असल्याचेही ते म्हणाले