कठुवा आणि उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या निषेर्धात 'कॅडल मार्च'
नेहरूनगर
2018-04-16
व्हीएस न्यूज - नेहरूनगर येथील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी कठुवा आणि उन्नाव येथील सामूहिक बलात्काराच्या निषेर्धात 'कॅडल मार्च' काढत आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली. ज्योति इंग्लिश स्कुल येथून कॅडल मार्चला सुरवात करुन संतोषी माता चौकातून पुन्हा ज्योति इंग्लिश स्कुल येथे मार्चचा समारोप झाला.