व्हीएस न्यूज – मोठे राजकीय फेरबदल जम्मू-काश्मीर सरकारमध्ये घडले असून निर्मल सिंह यांनी जम्मू-काश्मीर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता कविंद्र गुप्ता हे निर्मल सिंह यांच्या जागी जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सध्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे कविंद्र गुप्ता हे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सोमवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून, अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांचे संयुक्त सरकार आहे.
भाजपच्या काही मंत्र्यांनी कथुआ बलात्कार प्रकरणामध्ये आरोपींचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर सुरुवातीला दोन आणि त्यानंतर उर्वरित ९ अशा राज्य मंत्रिमंडळातील भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दरम्यान, रविवारी रात्री उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही पदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राजकीय फेरबदलासंदर्भात कविंद्र गुप्ता म्हणाले की, माझ्यावर पक्षाने विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू. यावेळी पीडीपीसोबतच्या संबंधांसोबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी सांगितले की,पीडीपीसोबत चांगले संबंध स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. शिवाय, युतीच्या सरकारमध्ये सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचाही आमचा प्रयत्न असेल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002