व्हीएस न्युज - संत रोहिदास नगर , गोरेगांव (पूर्व )मुंबई येथे आर. पी.आय चे उत्तर -पश्चिम ज़िल्हा कार्याध्यक्ष जे . एम .शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आर.पी.आय राष्ट्रीय अध्यक्ष व ,सामाजिक न्याय मंत्री मा. रामदास आठवले यांच्या हस्ते २७ एप्रिल रोजी करण्यात आले . या वेळी प्रमुख उपस्तिथी मध्ये ज़िल्हा अध्यक्ष मा . प्रकाश जाधव ,मुंबई शहर अध्यक्ष मा. गौतम सोनवणे ,मा. प्रवीण मोरे ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवा आघाडी मा .अॅड. अन्वरअली अन्सारी ,मुंबई प्रदेश सचिव मा . गणपतदादा भोईर . मुंबई प्रदेश कार्याध्यक्षां महिला आघाडी सौ .उषाताई रामलू ,जिल्हा अध्यक्ष मायनॉरिटी मा . बाबू इस्तेकार ,गोरेगावं तालुका अध्यक्ष मा. रमेश पाईकराव ,सरचिटणीस गोरेगांव मा.रमेश पाळंदे आदि मान्यवर उपस्थिती होते .
आर.पी.आय चे उत्तर -पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष मा. जे.एम शेख यांच्याशी आमचे व्हि. एस न्यूजचे प्रतिनिधी भानुदास गायकवाड यांनी संवाद साधला असता मा. जे.एम शेख म्हणाले की जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्याचा हेतू स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविणे व सामाजिक ऐक्य निर्माण करून पक्षाची ताकद वाढविणे हाच आहे .
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002