व्हीएस न्यूज- वडीलासमवेत दुचाकीवरून घरी जाणाऱ्या दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी सराफाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील 29 हजार रूपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे मण्याची पिशवी हिसकावून नेली. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास निगडी येथे घडली.
मयुर मफतलाल सोनी (वय-19, रा. आकुर्डी) याने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर व त्याचे वडील नेहमीप्रमाणे सराफी पेढी बंद करून घरी दुचाकीवरून जात होते. थरमॅक्स चौकात आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी मयुरच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्यामुळे दोघेही खाली पडले. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्याकडील 29 हजार रूपये किंमतीचे 10 गॅ्रम सोन्याची पिशवी हिसकावून नेली. फौजदार सचिन सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.