नगरसेवक कांबळे खूनप्रकरण; आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
दिघी
2018-06-28
व्हीएस न्यूज- आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी दोन आरोपींना दिघी पोलिसांनी अटक केली होती. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्य़ात घेतले होते. दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कांबळे यांचा मावस भाऊ कृष्णा घोलप (वय-24, रा. देहूफाटा) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रफुल्ल गबाले व संतोष माने यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी हा अल्पवयीन म्हणजे 17 वर्षांचा आहे. आरोपींना पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या होत्या. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.