- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. यात चालक जखमी झाला
असून टेम्पोमधील कोंबडीची पिल्ल दगावली. हा टेम्पो उरली कांचन येथून पुण्याच्या दिशेने जात होता. ही
घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. अपघात झाल्यानंतर टेम्पोमधून पिल्लं बाहेर आली आणि सैरावैरा
पळत सुटली यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन
टेम्पो पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून कोंबडीची बरीच पिल्लं दगावली तर काही
पिल्लं रस्त्यावर सैरावैरा धावू लागली. यामुळं बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ समोर झाला. गाडी रस्त्याकडेला
पलटी झाली. अपघाताचा मोठा आवाज आल्याने,घाबरून कोंबडीची काही पिल्लं दगावली तर काही सैरावैरा
झाली.यामुळं बराच काळ वाहतुल विस्कळीत झाली. अद्याप वाहन चालकाचे नाव समजलेले नाही.
त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002