व्हीएस न्युज - मुंबई येथे 22 वर्षीय तरुणावर चार जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . शिवाय, पीडित तरुणाच्या क्रेडिट कार्डद्वारे गाडीत पेट्रोल भरलं आणि पैसेही काढले. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे .
पियुष चौहान, मेहुल परमार आणि असिफुल्लाह अन्सारी या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चौथा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे . आरोपींवर कलम 377 (अनैसर्गिक शारीरिक संबंध), कलम 399 (दरोडा) आणि इतर चार कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण इन्स्टाग्रामचा युजर होता. घटनेच्या दिवशी पीडित तरुणानं मुंबईत कुर्ल्यातील रेस्टॉरंटमधील स्वत:चा सेल्फी इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्याद्वारे आरोपींनी पीडित तरुणावर पाळत ठेवली. चाहते असल्याचे सांगत पीडित तरुणासोबत बाईक राईडची इच्छा व्यक्त केली.
जवळपास 20 मिनिटं बाईक राईडनंतर आरोपींनी तरुणाला थांबण्यास सांगितलं आणि जबरदस्ती करून कारमध्ये नेलं. चालत्या कारमध्येच त्याच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पीडित तरुणाला रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. पीडित तरुणानं ही सगळी माहिती कुटुंबीयांना सांगितल्यावर प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून 24 तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या. ज्या कारमध्ये हा प्रकार घडला, ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002