व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशमधील चित्रकूटजवळ गोव्यातील वास्को- द- गामा येथून पाटणा येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसला शुक्रवारी अपघात झाला. एक्स्प्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरले असून या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास चित्रकूटमध्ये वास्को- द- गामा – पाटणा एक्स्प्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरले. माणिकपूर स्थानकाजवळ हा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या दोन तासानंतर वैद्यकीय मदत घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय मदतकार्यासाठी विशेष पथकही रवाना झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून रेल्वे रुळाला तडा गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002