व्हीएस न्यूज - हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पती आणि पत्नीच्या शारीरिक संबंधाचे चित्रीकरण करून ते महिलेला दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र चित्रीकरण करणारा आरोपी फरार आहे. विशेष म्हणजे याआधीही आरोपीने पती-पत्नीचे चित्रीकरण केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंदन अष्टे हा फिर्यादी महिलेच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहायचा. तो गेल्या तीन महिन्यांपासून फिर्यादी महिला आणि तिच्या पतीमधील शारीरिक संबंधाचे चित्रीकरण त्यांच्या नकळत करत होता. सेल्फी स्टिकच्या मदतीने कुंदन हे चित्रीकरण करायचा. हे सर्व व्हिडिओ त्याने लॅपटॉपमध्ये सेव्ह केले होते. विशेष म्हणजे या अगोदरही त्याने पती-पत्नीचे व्हिडिओ काढले असून, ते फिर्यादी महिलेला मोबाईलद्वारे दाखविले आहेत. यानंतर पीडित महिलेने हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल केला. आरोपी कुंदन अष्टे हा फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002