व्हिएस न्यूज – भारताने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात एक नवा विक्रम रचला आहे.
थिसेरा परेराला भारताचा यष्टीरक्षक असलेल्या धोनीने यष्टिचीत करून बाद केले आणि एक नवा विक्रम रचला. टी-२० क्रिकेटमधील परेरा हा धोनीचा २०० वा बळी ठरला आहे. धोनीने परेराला बाद करत टी-२० मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमल या यादीत २०७ बळींसह पहिल्या स्थानी आहे.