व्हिएस न्युज -वाकड येथील अटलांटा सोसायटी जवळ प्रेयसीने प्रियकरावर धारदार कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी तीनच्या सुमारास घडली.हॉटेलमधून प्रियकराला जाण्यास सांगितले असताना देखील तो गेला नाही याचा राग मनात धरून प्रेयसीने प्रियकरवेर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.याप्रकरणी महिलेवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नारायण जाधव (वय-४५ रा. श्रीधरनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेवर भादवी कलम ३०७ आणि आर्म ॲक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय जाधव हा रिक्षा चालक आहे तर महिला हॉटेल चालवते. फिर्यादीचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध असून दोघेही वाकड येथे राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्य़ादी हॉटेलमध्ये आले. त्यावेळी महिलेने त्याला हॉटेलमधून राहते घरी जाण्यास सांगितले.मात्र, संजय जाधव हे गेले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाले.संतापलेल्या महिलेने धारदार कोयत्याने संजय जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात,हातावर, छातीवर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002