एसबीपीआयएम मध्ये एचआर परिसंवादाचे आयोजन
व्हिएस न्यूज - कोरोना ही मानव इतिहासामधील सर्वात मोठी महामारी आहे. परंतू कमी मनुष्यबळात सेवा, सुविधा, उत्पादन आणि अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी आपल्या पारंपरिक पध्दतीत आमुलाग्र बदल केले त्यामुळे यावर नियंत्रण मिळविता आले असे प्रतिपादन मनुष्यबळ अधिकारी ओजस्वी सपतनीकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एसबीपीआयएम आणि डिव्हाइन एचआर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने एचआर परिसंवादाचे आयोजन आकुर्डी येथील एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे सोमवारी (दि. २८ फेब्रुवारी) करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उड चलो कंपनीच्या मनुष्यबळ अधिकारी ओजस्वी सपतनीकर, पॅनासोनिक लाईफ सायन्सचे प्रमुख एचआर अधिकारी आकाश सांगोले, एमक्युअरचे एचआर उपमहाव्यवस्थापक रमेश तावरे, फोर्स मोटर्सच्या सहाय्यक व्यवस्थापक एचआर शीतल जगताप, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, टीयुव्ही नॉर्डच्या एचआर प्रीती साखरे आदी उपस्थित होते. या परिसंवादात कोरोना महामारी दरम्यान एचआर मधील आव्हाने आणि नंतरची पुर्नबांधणी या विषयावर तज्ञ व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ओजस्वी सपतनीकर म्हणाल्या की, कोरोना काळामध्ये अवघ्या जगाचे चक्र ठप्प झाले होते. याचा विपरित परिणाम अर्थ, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर जास्त झाला. यातून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांबरोबर मनुष्यबळ अधिका-यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन करुन नियंत्रण मिळविले. त्यांच्यामुळेच कोट्यावधी नागरिकांचे लसीकरण शक्य झाले. तसेच ऑनलाईन पध्दतीने शिक्षण, नोकरी, व्यवहार, व्यवसाय, आरोग्य विषयक जनजागृती करणे शक्य झाले. अशा आपत्कालीन परिस्थितीत उत्कृष्ट मनुष्यबळ व्यवस्थापनाचे महत्व अधोरेखित होते असेही ओजस्वी सपतनीकर यांनी सांगितले.
परिसंवादाच्या आयोजनात डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. ईरम अन्सारी, प्रा. शिल्पा कुदळे, प्रणाली यादव, विजी नंम्बीयार, निकिता परदेशी, क्षितीज माने, यज्ञेश गरुड, दर्शन परदेशी, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी सहभाग घेतला.
या परिसंवादाचे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002