व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती लाच प्रकरणी अटक असलेले स्थायी समितीचे सभापती नितीन लांडगे व चार कर्मचारी यांचा जामीन अर्ज शिवाजीनगर कोर्टाने आज पुन्हा फेटाळला असून त्यांना सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायधीस एस बी हेडाऊ यांनी दिला निर्णय!
आज सकाळी शिवाजीनगर कोर्टात एस बी हेडाऊ यांच्या कोर्टापुढे आरोपींना हजर केले सुमारे 45 मिनिटे आरोपी व सरकारी वकील यांच्यात प्रश्नोत्तरे झाली व त्यानंतर न्यायमूर्ती एस बी हेडाऊ यांनी आरोपींना पुन्हा येत्या सोमवारी दि 23 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती कार्यालयात दि 18 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली.रोख रक्कम व काही साहित्य जप्त करण्यात आली.त्यांना गुरुवारी शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता शनिवार सकाळी म्हणजे आज सकाळी 11 वाजेपर्यंत पोलीस कोठडी दिली. त्यांना चौकशीसाठी पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते.
आज पोलिसांनी सभापती नितीन लांडगे व पाच कर्मचारी यांना सकाळी 11 वाजता हजर केले असता कोर्टाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला असून त्यांना सोमवारी पुन्हा हजर करण्याचे आदेश देण्यात आले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002