व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्याकडून दर वर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलेचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा "सलाम 2022 पुरस्कार" हा महिला सक्षमीकरण, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि कला क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन व डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या रोटरीच्या जिल्हा राज्यपाल मा. मंजू फडके, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, संचालिका व विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर, सल्लागार डॉ. पी. जयराज तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सारंग माताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व गणेश वंदना आणि गान सम्राज्ञी लता दीदीना आदरांजली वाहत त्यांनी गायलेल्या निवडक गाण्याचे सादरीकरण पब्लिक स्कूलच्या महिलांनी केले. आणि कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रणजित पाटील प्राचार्य डॉ डी वाय पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांनी केले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने विविध सामाजिक कार्याचा आढावा अध्यक्ष संतोष जाधव यांनी मांडला.
मनोगत –
सारंग माताडे, सचिव- रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन -
“समाज कार्यातून ठसा उमठवणाऱ्या अष्टपैलू व्यक्तीचा सन्मान करताना आज स्त्रीत्वचा सन्मान होत असल्याची भावना” सचिव सारंग माताडे यांनी व्यक्त केली.
मंजू फडके, रोटरीच्या जिल्हा राज्यपाल -
“नुसती नाती नाहीत तर समाज घडवणारी, दुसऱ्याला पुढे घेऊन जाणारी, मुलांना संस्कार देणारी, चांगला देश निर्माण करणारी आणि नात्याबरोबर समाजामध्ये एकमेकांसाठी उभी राहणारी कोण असेल तर ती स्त्री आहे याचा मला अभिमान वाटतो, आज या दिनानिमित्त कर्तृत्त्ववान महिलाचा एक गुण आपण आत्मसात करूयात आणि एका महिलेने दुसऱ्या महिलेला पुढे जाण्यासाठी साथ देऊया तरच या दिनाचे सार्थक होईल”. असे मत मंजू फडके रोटरीच्या जिल्हा राज्यपाल यांनी व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या, माझ्या हस्ते डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांचा सन्मान होतो आहे याचा मला फार आनंद होत आहे.
डॉ. भाग्यश्रीताई पाटील, प्र-कुलपती - डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे -
“आज मला मिळालेला सलाम पुरस्कार माझ्या सोबत कार्यरत असणाऱ्या महिलांना मी समर्पित करते, स्त्री असणे ही भाग्याची देणगी असल्याचे मी समजते असे मत डॉ भाग्यश्रीताई पाटील व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या की, शेती क्षेत्रापासून सुरू झालेला माझा प्रवास शिक्षण, आरोग्य, कला आदी क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत मला सर्वाचेच पाठबळ मिळाले. हा प्रवास सहज सोपा नव्हता त्यासाठी कष्ट करण्याची ताकद व जाणीव माझ्या आई वडीलांकडून मिळाली. आपण ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी महिलांनी कायमच सकारात्मक विचार घेऊन चालाल तरच यशस्वी व्हाल” असे मत डॉ भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबची आम्हाला कायम साथ असते. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विविध महाविद्यालयांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. उज्ज्वला शिंदे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, प्राचार्य मृदुला महाजन, प्राचार्य डॉ. रेखा पाठक यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिमा चव्हाण, प्रा. अलकनंदा माताडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार डॉ. मृदुला महाजन यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002