व्हिएस न्यूज - "कौशल्य प्रशिक्षण हे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मोठया प्रमाणावर काम करते, या लोकांकडे नीट लक्ष देऊन त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले तर ते सुद्धा चांगले आयुष्य जगू शकतात, असे विचार मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता अवचट पुणतांबेकर यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस ओपन एजुकेशन सोसायटीचा 18 वा स्थापना दिन, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगची सिल्वर जुबली आणि सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ शा. ब. मुजुमदार हे होते. तसेच सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. स्वाती मुजुमदार या उपस्थीत होत्या.
यावेळी एससीडीएलच्या सिल्वर जुबली लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुक्ता अवचट पुणतांबेकर म्हणाल्या, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग हे कौशल्य प्रशिक्षण देऊन अनेक युवकांच्या आयुष्यात खूप मोलाचा बदल करत आहे. कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांची आर्थिक परिथिती सुधारून सुंदर आयुष्य जगात आहेत."
डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “तळागाळातील लोकांना आम्ही कौशल्य प्रशिक्षण देत आहोत, हे प्रशिक्षण देताना व्यवसाय व बाजारातील मागणी चे भान ठेवले आहे आणि त्यानुसार प्रशिक्षण देत आहोत. दुर्गम भागात शिक्षण पोहचवण्या करतात ऑनलाईन लर्निग हे महत्वाचे ठरत आहे. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगला झालेली २५ वर्ष यात अतिशय मोलाची भूमिका बजावतात. पुढील पाच वर्षात नवीन दिशा घेण्याची गरज आहे. 'एजुकेशन ऑन डिमांड' - शिक्षणा बरोबर अधिक कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग मध्ये आता आपण सर्टिफिकेट आणि डिप्लोमा देत आहोत पण पुढील दोन वर्षात याचे ओपन युनिव्हर्सिटी मध्ये परिवर्तन करून मुलांना डिप्लोमा न देता डिग्री दिली जाईल असा माझा भविष्यासाठीचा मानस आहे".
शा. ब. मुजुमदार म्हणाले," एससीडीएल सोबत खूप लोक जोडली गेली आहेत आणि त्यात आमचे कर्मचारी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. २५ वर्ष हा काही सोपा प्रवास नाही. हि भाग्याची गोष्ट आहे. आमच्या सोबत येणाऱ्या बऱ्याच लोकांनी सुचवलेल्या गोष्टी करत गेलो आणि त्याला लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला, पाहता पाहता विद्यार्थी संख्या २ लाख पर्यंत गेली. प्रत्येक शिक्षण संस्थेकडे सांगण्यासाठी स्वतःचा आपला प्रवास असतो. आमचा हा प्रवास स्पष्ट दूर दृष्टी पासून सुरु झाला, समाजातील या बदलांन प्रमाणे आपण बदलणे गरजेचे आहे." यावेळी त्यांनी अनिल अवचट यांच्या आठवणींना देखल उजाळा दिला.
कार्क्रमात निखिलेश कुलकर्णी, योगेश जोशी, हेमंत सेठिया, अतुल उपाध्याय या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गायत्री पिल्लई, दिलीप शर्मा, ऋतुपर्ण मुखर्जी, नमिता कडू, मधुरा जोशी, ज्योतीका कोळतकर, यश केंजाळे या उतुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा हि या वेळी सत्कार करण्यात आला. २५ वर्ष व अधिक वर्षांपासून जोडलेल्या कर्मचाऱ्यांचा हि या वेळी सत्कार करण्यात आला, या मध्ये रजिस्टार कुंभार, नूतन गोरे, सुनील धुमाळ, रवींद्र शेलार, भास्कर निकम हे होते. १० वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये सुहास भोसले, पदंप्रिया इरावती, यांचा सत्कार करण्यात आला. १५ वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये आमला किरण जोशी यांचा सत्कार करण्यात आला. ३० वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये प्रदीप डोळस, प्रमोद भोसले, शोभा अमोल यांचा सत्कार करण्यात आला. पुढील कार्यक्रमात एससीडीएल इमारतीच्या मिनिएचरचा केक कापण्यात आला.
या वेळी कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितानी भरभरून प्रतिसाद दिला. शालिनी नायर यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्त मेजर सोनाली कदम यांनी यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002