४५ कोटी १५ लाख ६२ हजार रुपयेच्या विकास कामांना मंजुरी
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्य करणा-या निवासी मिळकतधारकाचा कोरोनामुळे वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये मृत्यू झालेला असल्यास त्याच्या कुटुंबाला दिलासा देणेकामी २०२२-२३ या सरकारी वर्षाकरीता कराचे व करदोत्तर बाबीचे दर निश्चित करताना अशा मिळकत धारकांना सामान्य कर रकमेत १०० टक्के सूट तसेच मिळकत कर हस्तांतरण नोंद नोटीस फी माफ करण्याचा निर्णय दिनांक- ०८/१२/२०२१ बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याकरीता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून सदर विषय महापालिका सभेकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित एकूण ४५ कोटी १६ लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते. या बैठकीत विषय पत्रिकेवरील ३८ आणि ऐनवेळेचे ५ अश्या एकूण ४३ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामधे प्रभाग क्र. १४ मोहननगर, काळभोरनगर, डी-३/डी-१ ब्लॉक परिसरातील रस्त्याचे आवश्यकतेनुसार मजबुतीकरण आणि सुधारणा करण्यासाठी येणा-या र. रु. १ कोटी ६५ लाख, वायसीएम रुग्णालयातील कॉरीडॉर, अंतर्गत आणि बाह्य परिसरातील रस्ते व पार्किंगसह गार्डन तसेच रुग्णालयीतील डक्ट व ड्रेनेज लाईनची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छतेसाठी येणा-या र. रु. १५ कोटी ९९ लाख, वाल्हेकरवाडी आणि चिंचवडेनगर भागातील फुटपाथ, पेव्हींग ब्लॉक, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, नाले यांची दुरुस्तीची कामासाठी येणा-या र. रु. ३१ लाख ४५ हजार, शिवनगरी, प्रेमलोक पार्क आणि दळवीनगर भागातील फुटपाथ, पेव्हींग ब्लॉक, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, नाले यांची दुरुस्तीची कामासाठी येणा-या र. रु. ३० लाख ४८ हजार, मनपाच्या मैलाशुध्दीकरण केंद्र तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करुन घेण्यासाठी येणा-या र. रु. ७६ लाख ०३ हजार, प्रभाग क्र. ११ मधील साने चौक ते केशवनगर पर्यंत पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी येणा-या र. रु. २७ लाख ९७ हजार, टेल्को रस्त्यावरील बालाजीनगर येथे सी.डी.वर्क बांधणे आणि अनुषंगीक कामे करण्यासाठी येणा-या र. रु. ६ कोटी ३३ लाख,
प्रभाग क्र. १२ मधील ताम्हाणेवस्ती त्रिवेणीनगर परिसरातील सेवावाहिन्याकरीता खोदलेले चर खुडीमुरुम भरण्यासाठी येणा-या र. रु. २८ लाख ५९ हजार रुपये, राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पॉलीग्रास हॉकी मैदान तसेच इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार मंडप विषयक आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या र. रु. ३२ लाख ९३ हजार रुपये, आकुर्डी येथील (आयएसबीआर) ३० द.ल.लि. क्षमतेचे मैलाशुध्दीकरण केंद्राचे चालन, देखभाल व दुरुस्ती कामासाठी येणा-या र. रु. ४ कोटी रुपये, देहू आळंदी ३० मीटर डी. पी. रस्त्याचे स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्ती कामे करण्यासाठी येणा-या र. रु. ९८ लाख २१ हजार, टेल्को रस्त्यावरील इलेक्ट्रॉनिक सदन चौकातील सी. डी. वर्क रुंद करणे आणि नाला बांधणे आणि इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या र. रु. १ कोटी २२ लाख रुपये, काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील खोदलेल्या चरांची दुरुस्ती आणि इतर स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणा-या र. रु. १ कोटी २५ लाख रुपये, प्रभाग क्र. १७ मध्ये शासनाच्या नियमानुसार गतिरोधकांची दुरुस्ती करण्यासाठी येणा-या र. रु. ३३ लाख ७१ हजार रुपये, चिंचवडेनगर भागातील रस्त्यांची दुरुस्ती हॉटमिक्स पध्दतीने करण्यासाठी येणा-या र. रु. ३४ लाख १० हजार रुपये, शिवनगरी भागातील रस्त्यांची दुरुस्ती हॉटमिक्स पध्दतीने करण्याकामी येणा-या र. रु. ३४ लाख १६ हजार रुपये, प्रेमलोक पार्क, दळवीनगर भागातील रस्त्यांची दुरुस्ती हॉटमिक्स पध्दतीने करण्याकामी येणा-या र. रु. ३५ लाख ३ हजार रुपये, प्रभाग क्र. १८ मध्ये रस्त्यांची दुरुस्ती जीएसबी, कोल्डमिक्स वेटमिक्स पध्दतीने करण्यासाठी येणा-या र. रु. २९ लाख २६ हजार रुपये अश्या एकूण ४५ कोटी १५ लाख ६२ हजार रुपयेच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002