मालमत्ता कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचा-यांना प्रोत्साहनपर योजनेस मंजूरी
व्हीएस न्यूज - पिंपरी मनपा स्थायी समितीची २६५ क्रमांकाची बैठक शुक्रवारी (दि. ४ मार्च) ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन लांडगे होते. या बैठकीत ८२ कोटी ५२ हजार रुपयांच्या विविध विकासकामांना मंजूरी देण्यात आली.
विषय पत्रिकेवरील एकूण ७ विषय आणि ऐनवेळचे ५२ विषय अशा एकूण ५९ विषयांना या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यामध्ये विविध विकासकामांच्या ७१ कोटी ९२ लाख ४९ हजार रुपयांच्या विकासकामांना मंजूरी देण्यात आली. याशिवाय पवना प्रकल्प टप्पा चारच्या सिंचन पुर्नस्थापनेसाठी रक्कम रुपये १०,०८,०३,०००/- मंजूरी देण्यात आली.
तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनेक मिळकतींचा कोट्यावधी रुपयांचा मिळकत कर येणे बाकी आहे. ही वसूली ३१ मार्च २०२२ जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी यासाठी कर संकलन विभागातील कर्मचा-यांना प्रोत्साहन बक्षिस योजना आखण्यात आली आहे. त्यास देखिल शुक्रवारच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002